मुख्याध्यापक मनोगत

नविन मराठी शाळा, वाई    27-Sep-2025
Total Views |

पल्या नवीन मराठी शाळा, वाई या संकेतस्थळावर आपले मन:पूर्वक स्वागत आहे

तब्बल १२९ वर्षे स्त्री सबलीकरण व सक्षमीकरणाचे कार्य महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, पुणे अंतर्गत आमची शाळा कार्यरत आहे गुणवत्तापूर्ण व मूल्याधिष्ठित शिक्षण देण्याची गौरवशाली परंपरा आम्ही प्रयत्नपूर्वक पुढे नेत आहोत. नुकताच शाळेने सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करून एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.

आमचे प्रमुख ध्येय  पाठयपुस्तकापुरले शिक्षण न ठेवता विद्यार्थ्यांचा सर्वागीण व व्यक्तिमत्व विकास घडवणे हे आहे अभ्यासपूरक उपक्रम, सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा, विविध सृजनशील कार्यशाळा प्रत्येक बालकात आत्मविश्वास, मूल्यनिष्ठा आणि सामाजिक जाणीव विकसित करण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत.

या शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक मुलामध्ये सुप्त असलेल्या गुणांना वाव देणे, त्यांना नवे अनुभव देणे आणि जीवनातील आव्हानाना सामोरे जाण्यास तयार करणे हेच आमचे कार्यधोरण आहे.

संस्थेचे सक्षम मार्गदर्शन व भक्कम पाठिंबा याचे शाळेच्या यशात योगदान आहे. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांचा त्रिवेणी संगम हाच शाळेच्या प्रगतीचा पाया आहे. आपणा सर्वाच्या सहकार्यामुळेच शाळा ही पुढील पिढ्‌यांसाठी प्रेरणादायी ठरत राहील, असा मला विश्वास आहे.

आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार

मुख्याध्यापिका,

सौ.राजश्री शिंदे

नवीन मराठी शाळा वाई.