विद्याभारती सप्तशक्ती संगम महिला संमेलन

09 Dec 2025 14:26:45
 

🔹🔹विद्याभारती सप्तशक्ती संगम महिला संमेलन उत्साहात संपन्न. 🔹🔹
 सोमवार दि. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी वाई प्रकल्प 'सत्यवती जोशी सभागृह' येथे उत्साहात संपन्न झाले.....

संमेलनाच्या अध्यक्षस्थानी मा. सौ. अंजली काणे, प्रमुख उपस्थिती मा. सौ. जान्हवी अयाचित (विद्याभारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत मुख्य संयोजिका) , प्रमुख वक्त्या मा. सौ. मुग्धा वैद्य, मा. सौ. मनीषा घैसास, आजन्मसेविका मा. सौ. विद्या राव, मा.मुख्याध्यापिका सौ. सुजाता आगाशे, मा. मुख्याध्यापिका सौ. छाया लोखंडे, मा. मुख्याध्यापिका सौ. मेघा सातपुते उपस्थित होत्या.. संमेलनाची सुरुवात दीपप्रज्वलन व नवयुग का नवविचार या सुंदर गीताने झाली. संमेलनाचे प्रास्ताविक मा. मुख्याध्यापिका सौ. छाया लोखंडे यांनी केले. प्रमुख वक्त्या मा. सौ. मुग्धा वैद्य यांनी "कुटुंब प्रबोधन व पर्यावरणाबाबत भारतीय दृष्टिकोन" या विषयावर उत्तम मार्गदर्शन केले. प्रमुख वक्त्या मा. सौ. मनीषा घैसास यांनी "भारतीय विकासात महिलांचे योगदान" या विषयावर सविस्तर विवेचन केले. दोन्ही वक्त्यांच्या व्याख्यानामुळे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला पालक अगदी मंत्रमुग्ध झाल्या विद्यार्थिनी व महिला पालकांनी कर्तुत्ववान महिला 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर' 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले' यांच्या जीवनपटावर आधारित सादरीकरण केले. वाई परिसरात अग्रेसर ठरलेल्या महिला माता सौ. मीरा अभ्यंकर व सौ. कृष्णाबाई पिसाळ यांचा सन्मान करण्यात आला. विद्याभारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत मुख्य संयोजिका मा. सौ. जान्हवी अयाचित यांनी महिला पालकांशी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतातून संवाद साधला. संमेलनाच्या अध्यक्षा मा. सौ. अंजली काणे यांनी महिलांचे 'स्वत्व व स्वावलंबन' या विषयावर प्रकाश टाकला. या संमेलनासाठी महिला पालकांनी उत्तम प्रतिसाद दिला. आरुणि विद्यामंदिरच्या मा. मुख्याध्यापिका सौ. मेघा सातपुते यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. संमेलनाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका संगीता साळुंके यांनी केले. शांती संकल्पाने संमेलनाची सांगता झाली.

 सप्तशक्ती कार्यक्रम
Powered By Sangraha 9.0